विवाह म्हणजे दोन जीवांचे सुमधुर मिलन असे आपण नेहमीच म्हणत असतो. विवाह म्हणजे खरोखर मानवी आयुष्यकाळातील एक सुखद अत्त्युच्च आनंद देणारी घटना असते. लग्न झाल्यावर बऱ्याच जणांचे संसार सुखात पार पडतात. तर काहींचे मात्र सूरच न जुळल्यामुळे काही दिवसात किंवा काही वर्षातच ताटातूट होते. त्याचेच रुपांतर मग घटस्फोट किंवा इतर घटनांमध्ये होते. असे होऊ नये म्हणून सदर लेखाचा प्रपंच….
विवाह करण्यापूर्वी आपण सुरुवातीला वधू-वरांचा बायोडाटा बघतो. त्यानंतर एकमेकांना पसंत करण्याचा कार्यक्रम होतो. नातेगोते-रूप-वय-वजन-उंची-गुण-नाडी-शिक्षण-संपत्ती-पार्श्वभूमी असा फोनवर तपास सुरु होतो. कधीकधी माहिती वरवर काढली जाते. विषयास समजून न घेता नकार दिला जातो. दुसरे-तिसरे-चौथे-पाचवे स्थळं पाहणे सुरूच राहते. वय वाढत जाते. समस्या वाढत जाते. नाकारलेली स्थळंही आता चांगली होती असे वाटू लागते. पण वेळ हातातून निघून गेलेली असते. अशी चालू आहे सगळीकडे धावपळ…
संबंध जुळता जुळेना..याउलट काहीच तपास न करता संबंध जोडून काहीजण मोकळे होतात. काहींचे संसार टिकतात काहींचे चुकतात. संबंध जोडतांना सर्वात महत्वाचे म्हणजे विषयाचा तपास जास्तीत जास्त लोकांकडून-नातेवाईकानं कडून काढला गेला पाहिजे. पण वरवर तपास करून लगेचच घाईने नकार देऊ नये. दुसरी महत्वाची ज्या अपेक्षा ठेऊन तुम्ही स्थळ शोधताय त्या सर्वच अपेक्षा १००% पूर्ण होतील असे स्थळ तुम्ही शोधत असाल तर तुम्ही चुकताय नातेगोते-रूप-वय-वजन-उंची-गुण-नाडी-शिक्षण-संपत्ती-पार्श्वभूमी यात काहीतरी तुम्हाला तडजोड करावी लागेल तरच संबंध जुळून येतील. हा एका गोष्टीत तुम्ही तडजोड करूच नका ते म्हणजे ‘स्वभाव’…तुमच्या विचारांचा …तुमच्या घरात…माणसांमध्ये मॅच होईल असा जोडीदार निवडण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा. म्हणून विवाह जोडतांना एकमेकाला अनुरूप होईल (म्हणजे फक्त दिसणे नव्हे) जोडीदार शोधावा.
असा विचारांचा जोडीदार शोधण्यासाठी अवश्य भेट द्या www.telijagat.com आपल्या एका शेअर मुळे एखाद्याचे लग्न जुळू शकते.धन्यवाद !
– साभार-
copyright तेलीजगत.कॉम