संपर्क - 9890269698 वेळ - सकाळी १० ते सायं ७ वाजेपर्यंत

आमच्‍या विषयी

तेली वधू वर सूचक अनेक वेबसाईट असतांना पुन्हा नवीन वेबसाईट कशाला ? असाही प्रश्न अनेकांना पडू शकतो.परंतु समाज बांधवांनो ! वेबसाईट अनेक असल्या तरी त्यापैकी अनेक वेबसाईट चे काम सुरु होऊन काही दिवसातच बंद पडले. त्याची कारणे लक्षात घेऊन ह्या वेबसाईटची निर्मिती आपण करीत आहोत. वेबसाईट चालविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची कायम स्वरूपी वेळ देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करून स्वतंत्र टीम उभी केलेली आहे. याद्वारे समाजाची सेवा करण्याची फार मोठी संधी असली तरी काम सातत्याने चालू राहण्याचं आव्हान समोर असणार हे निश्चित आहे.

तसेच या वेबसाईट वर नोंदणी करण्यासाठी घेत असलेली फी मात्र रू. ५९९/- च्या माध्यमातून वेबसाईट चा वर्षभर चालणारा मेन्टनन्स, वेब डेव्ह्लोपिंग व जाहिरात यासाठी तसेच कार्य करणाऱ्या टीम चे मानधन यावर खर्च होणार आहे. त्यामुळे हे कार्य सतत चालू राहील. पाच हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंत फी एका वर्षासाठी घेणाऱ्या प्रस्थापित इतर मोठ्या ब्रँडेड कंपनींच्या वेबसाईट समोर आहेत. पण आमचे कार्य मोठे होईल ते समाज बांधवांच्या सहकार्यामुळेच याची खात्री वाटते.

समाजात अनेक समस्या आहेत. त्यापैकी लग्न जुळविण्यासाठी लागणारा जास्तीचा वेळ ही एक मोठी समस्या आहे. आपणास अनुरूप / योग्य स्थळ हे आपल्या जवळपासच असते पण माहिती नसल्यामुळे आयुष्यातील महत्वाची अनेक वर्ष निघून जातात. वय वाढत जाते. चिंता वाढत जाते. पण अलीकडे समाजाचे होणारे विविध परिचय मेळावे व वेबसाईट च्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून जुळणारे अनेक विवाह आशादायक चित्र निर्माण केल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाने आपल्या समाजासाठी वेळ देऊन योग्य त्या विवाह विषयास गती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही याचसाठी ही यंत्रणा उभी करीत आहोत.

अलीकडे मुला मुलींच्या पालकांनी अवास्तव अपेक्षा ठेवण्यापेक्षा एखादा विषय मुळापासून समजून चांगला तपास करून होकार नकार कळविला पाहिजे. पण वरवर विषय ऐकून नकार देण्याची प्रवृत्ती वाढत चाललीय. विवाह जोडणीमध्ये रंग,रूप,उंची,संपत्ती,राशी,कुंडली यावर भर देण्यापेक्षा स्वभावगुण लक्षात घेऊन स्थळ पसंत करावे.एकमेकांना समजून घेणाऱ्या जोडीदाराची निवड करावी अशी आमची भूमिका आहे.बाकी कशाला महत्व द्यायचे हे तुम्ही ठरवा. आपल्या समाज बांधवांपर्यंत हा मेसेज पोचविण्यासाठी शेअर करा.आजच आपल्या घरातील वधू वरांची वेबसाईट वर नोंदणी करा.

 
 
 
 
 
 
Open chat
आपणास काही मदत हवी आहे काय ?
नमस्‍कार !
तेलीसमाज वधू वर सूचक केंद्रात आपले स्‍वागत !